•150 चा वर मोटारसायकल रॅलीत.
अजय कंडेवार,वणी :- शहरातील वाहतूक पोलिसांनी दि.23 मार्च 2023 रोजी हेल्मेट जनजागृती बाईक रॅली काढली. हेल्मेट वापरा, अपघात टाळा असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. हेल्मेट न वापरल्यास जीवास धोका होतो. शिवाय विनाहेल्मेट प्रवास केल्यास “आता यमराजचे द्वार खुले “, असाही संदेश या माध्यमातून देण्यात आला.Police helmet awareness…!Over 150 in motorcycle rally.
इतरचा तुलनेत जीवघेण्या अपघातांचे प्रमाण तालुक्यातच मागील काही महिन्यांपासून अधिक जास्त आहे. मात्र, फक्त हेल्मेट न वापरल्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. दुर्दैवाने हा आकडा मोठा आहे. किमान आपल्या कुटुंबीयांच्या आनंदासाठी आणि स्वत:च्या जीवासाठी प्रत्येकाने हेल्मेटचा जरूर वापर करावा, असे आवाहन संजय आत्राम वाहतूक शाखा प्रमुख व वाहतूक विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाइक रॅलीच्या आरंभ प्रसंगी त्यांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधीला सांगीतले .Police helmet awareness…!Over 150 in motorcycle rally.
उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पूज्जलवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी देतांना…
रॅलीचे आयोजक संजय आत्राम वाहतुक नियंत्रण उपशाखा वणी यांचा वतीने शासकीय मैदानात सकाळी 10.00 वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पूज्जलवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून भव्य बाइक रॅलीस प्रारंभ झाले. वाहतूक पोलिसांच्या तसेच विविध संघटनांच्या माध्यमातून शहरात सातत्याने वाहतूक नियम तसेच हेल्मेट व सीट बेल्टबाबत व वाहतुकीचा नियमाची जनजागृती केली . सदर रॅली शहरातील टिळक चौक-शहीद भगतसींग चौक -खाती चौक-सर्वोदय चौक-टागोर चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- गांधी चौक -साई मंदिर चौक या मार्गाने काढण्यात आली.
या सदर रॅलीमध्ये TDRF पथक, लो.टि.चे N.C.C पथक,N.S.S चमु ,सुशगंगा पॉलीटेक्नीक विद्यार्थी, शहरातील नागरीक ,पत्रकार बंधु , वाहतूक शाखेचे अधिकारी ,कर्मचारी, पोलिस कुटुंबीय तसेच नागरीक अशे सुमारे 200 चा वर लोकांनी सहभाग घेत या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.