•वणी पो. स्टे. आवारातील घटना.
अजय कंडेवार,वणी :- पोलीस स्टेशन वणी येथे महिला कर्मचारी छाया उमरे ड्युटीवर हजर असतांना एक मुलगा व एक मुलगी लग्ण करून वणी पोलीस स्टेशनला आले. त्याच वेळी मुलीचे नातेवाईकांना त्या दोघांचे लग्नाला विरोध असल्याने पोलीस स्टेशन वणी येथील ठाणे अंमलदार कक्षात आले व स्टेशन डायरी टेबल समोर येवुन त्यांचे मुलीला ओढताठ करून त्या दोघांना ते घरचे नातेवाईक मारण्यास तत्या प्रेमीयुुलांचा अंगावर गेले . पोलीस कर्मचारी समोरच असतांना हा प्रकार इथे करू नका म्हणून त्यांचे भांडन सोडविण्याचा व समजवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु शंकर लिंगाना पोन्नलवार (वय ४६ वर्ष) ,योगीता शंकर पोन्नलवार (वय ३९ वर्ष ) दोन्ही रा. तेली फैल वणी यांनी हिला शिवीगाळ करून ओढताण करून ढकलुन दिले. त्यात त्या भांडणात पोलीस शिपाई छाया हिला जबर मार पोटाला बसला.
सोनू शंकर पोन्नलवार हीचे वडील, आई, बहीण मोनु यांनी पोलीस स्टेशला येवुन कामकाज सुरू असतांनाच सरकारी कामात अडथडा करून ढकलाढकल केली. पोटात दुखापत झाल्याने खाजगी हॉस्पीटल वणी येथे उपचाराकरीता भर्ती केले. पोलिस शिपाई छाया उपचार झाल्यानंतर वणी पो.स्टेशन गाठले व रितसर तक्रार करून पो.स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आले.
त्यात आरोपीताविरूध्द ३५३,३३२,५०४,३४ भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात सदर गुन्हयाचे तपासात आरोपी नामे १) शंकर लिंगान्ना पोन्नलवार वय ४६ वर्ष २) योगीता शंकर पोन्नलवार वय ३९ वर्ष दोन्ही रा. तेली फैल वणी यांना सदर गुन्हयात कायदेशीररित्या अटक करून प्रथम श्रेणी न्यायालय, वणी येथे हजर केले असता आरोपीतांना जिल्हा कारागृहात रवानगी केली.
सदर ची कार्यवाही डॉ. पवन बनसोड (पोलीस अधिक्षक यवतमाळ), पियुष जगताप (अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ), संजय पुज्जलवार (उप.वि.पो.अ. वणी) यांचा मार्गर्शनात ठाणेदार पो.नि. प्रदिप शिरसकर यांचे आदेशावरून करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा तपास पो.उप.नि प्रविण हिरे करीत आहे.