सुरेंद्र इखारे, वणी – मुगदाई धबधबा डोमा तहसील चिमूर येथे दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोज रविवारला सकाळी 12.00 वाजता पैदागिर चित्रपटाचे प्रमोशन कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती पैदागिर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जीवने सर, अभिनेत्री सांची जीवने व विशेष अतिथी रामराव ननावरे अध्यक्ष मुगडाई ट्रस्ट डोमा, प्रा भगवान ननावरे अभ्यासक वनाधिकार कायदा, राहुल दडमल अध्यक्ष आ मा ज वी युवसंघटना महाराष्ट्र, श्रीकांत एकुडे अध्यक्ष ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर, उपस्थित राहणार आहे.
तेव्हा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजबांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुगडाई चॅरिटेबल ट्रस्ट डोमा, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर यांनी केले आहे .