•आजी-माजी सैनिकांची उपस्थिती…
नागेश रायपूरे, मारेगाव:– पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना मारेगाव येथील मार्डी चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक नंदेश्वर आसुटकर मित्र परिवार व आजी – माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आले.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू – काश्मीर मध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे (CRPF) केंद्रीय रिजर्व पोलीस दलाच्या काफील्याचे जवळपास 78 वाहने नेशनल हायवे वरून, विस्फोटक घेवुन जात होते.दरम्यान पाकिस्तानी समर्पित जैश-ए- मोहम्मद या आतंकवादी संघटनेने एका वाहनावर निशाणा साधुन जब्बर धडक दिली असता विस्फोट झाला. आतंकवादयानी केलेल्या या आत्मघाती हल्ल्यात देशातील चक्क चाळीस जवान शहीद झाले होते.या घटनेला आज चार वर्ष पूर्ण झाले आहे.
या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या चाळीस वीर जवानांना मारेगाव येथे पुष्यमाला अर्पण करुन,कँडल लावण्यात आले. व दोन मिनिटं मौन पाळून शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ठाणेदार राजेश पुरी व माजी सैनिक देविदास खोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, ठाणेदार राजेश पुरी,जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, प्रा. सतीश पांडे सर ,नगरसेवक नदेश्वर आसुटकर, अंकुश माफुर,आर्मी सैनिक पवन किन्हेकर, पोलीस नाईक विजय बुरुजवाडे तसेच माजी सैनिक हबीब शेख ,देविदास खोले, शंकर मानकर, गंगाधर गाडगे, तसेच दिनकर डुकरे, समीर कुळमेथे, रॉयल सय्यद, आदी शहरातील शेकडो युवक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पवन किन्हेकर, नंदेश्वर आसुटकर व आदींनी परिश्रम घेतले.