Monday, January 19, 2026
Homeमारेगावपुरबाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान द्या

पुरबाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान द्या

तालुका काँग्रेस कमेटीचा मागणी
•तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नागेश रायपूरे, मारेगाव:– तालुक्यातील वर्धा नदी काठावरील पुराणे बाधीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 75 हजार प्रति हेक्टरी अनुदान व सरसकट पीक विमा आणि अतिक्रमित जमिनीचे ई पिक नोंदणी करा.या प्रमुख मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

मारेगाव तालुक्यातील सावंगी,कोसारा,दापोरा चिंचमंडल,गाडेगाव, बोरी (बु),चनोडा, केगावं, शिवणी (धोबे),तसेच मुक्ता, दांडगाव, आपटी, गोरज व वनोजादेवी या गावातील सर्व शेतजमिनी वर्धा नदी काठावर आहेत. सततच्या अतिवृष्टी ने वर्धा नदीला आज परंत चार वेळा पुर आल्याने शेतातल उभे पिके पुराच्या पाण्याखाली येवून पिके पूर्ण खरडून गेली आहेत.चक्क चौथ्यादां पेरणीची वेळ आल्याने शेतकरी बांधव मोठ्या अस्मानी सुलतानी संकटात सापडल्याने हवालदिल होवून आत्महत्या कडे वळत आहे.

22 जुन ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत चक्क 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविल्याचे भयाण वास्तव मारेगाव तालुक्याचे आहे.या सर्व आत्महत्या पिकांच्या नुकसानीमूळे झाल्याचे उघडकीस येत असुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत न मिळाल्यास पुन्हा मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचा दुर्दैवी घटना दिवसेंदिवस वाढतच जाईल.

यामुळे मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन
नदीकाठावरील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून नुकसान झालेल्या शेतजमिनीचे पंचनामे करून शासनाकडे पाठवण्यात यावे.व शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान देण्यात यावे.तसेच अतिक्रमन धारकांना पट्टे वाटप करुन त्या शेताचे ई पीक नोंदणी करावी.या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी तालुका काँग्रेस कमेटीचे माजी जि. प.सदस्य अरुणाताई खंडाळकर,तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, नगरसेवक नांदेश्वर आसुटकर, प्रवीण विखनकर,विनोद आत्राम,विलास पवार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments