•29 वर्षीय युवकाची आत्महत्या.
माणिक कांबळे /मारेगाव :- मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मूकटा येथील एका 29 वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवन यात्रा सम्पविल्याची दुर्देवी घटना घडली आहे.Again… taluka rocked by suicide.Suicide of 29-year-old youth.
प्रफुल उत्तम तुराणकर (29) असे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.या युवकाने काल 26मे च्या सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने चंद्रपूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते कालपासून त्याच्यावर शर्थीचे प्रयत्न सुरु असताना आज उपचारा दरम्यान सकाळी 6वाजताचे दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अविवाहित प्रफुल हा पुणे येथे बजाज कंपनीमध्ये काम करीत होता.गेल्या काहीं दिवसा पासून तो नुकताच मुकटा येथे आई वडीलाकडे आला होता.मात्र दरम्यान त्याची मानसिक स्थिती चिंताग्रस्त असल्याचे जाणवत असताना त्यानी आई वडिलांना शेअर केली नाही. काल दि. 26मे ला पुणे येथे परत जाणार होता. त्यामुळे आई त्यांचेसाठी डब्बा बनवून द्यायच्या कामात व्यस्त होती. तर वडील जनावरांना चारापाणी करायला गेले असताना प्रफुलने घरी असलेली विषारी द्रव्य प्राशन केले. एवढ्यात त्याला उलटी झाली या उलटीतून वास आल्याचे आईच्या लक्षात आले.त्यांनी तात्काळ वडिलांना बोलावून प्रफुलला चंद्रपूर येथील खाजगी दवाखाण्यात भरती केले होते.मात्र उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेह चंद्रपूर येथून मूकटा येथे जन्मगावी आणवून येथेच त्याचा अंतसंस्कार करण्यात आला आहे. प्रफुलच्या मागे आईवडील,दोन भाऊ आणि आप्तपरिवार आहे.