•160 गाळ्यांचा लिलाव होणार ….
अजय कंडेवार, वणी – शहरातील मध्य भागातील गांधी चौकात नगर परिषदेच्या 160 दुकान गाळे आहेत. त्याबाबतीत अनेक वर्षापासून पाठलाग पि. के टोंगे यांनी केले असता त्यांचा प्रयत्नाला अखेर यश मिळाले असुन उच्च न्यायालय नागपूर, खंडपीठाचा आदेशान्वये गांधी चौकातील गाळे लिलाव करण्याचा आदेश काढण्यात आले आहे. आदेशात वणी शहरातील एकूण 160 दुकान गाडे भाडे तत्वावर दे यासाठी ई- लिलाव करायचा आहे. सदर दुकान गाळे करिता निश्चित करण्यात आलेले मासिक भाडे स्थिर ठेवून अनामत रक्कमेवर इ लिलाव करण्यात येईल. ई- लिलाव प्रक्रियेचा तपशील व दुकान गाळे भाडे पट्टीवर वाटप करण्याकरिता निश्चित केलेल्या भाडे विषयक, पात्रता विषयक, प्रत्येक तपशील व इतर अटी व शर्ती नगर परिषद कार्यालय तसेच www. education.gov.i या संकेत स्थळावर जाऊन आऊकशन क्रमांक २०२२ mh -१५७५६ अन्वय दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ पासून पासून उपलब्ध आहे. तसेच रक्कम प्रति गाळे ५०,०००/- रुपये व ई-लिलाव फी प्रति गाळे २०००/- रुपये राहील.
तसेच डिजिटल सिग्नीचर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.या इ – लिलावात काहीं माहिती मधे अपूर्तता वाटत असेल तर नगर प्रशासनाशी संपर्क करावा तसेच तेव्हा शहरातील नागरिकांनी गाळे लिलावात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.