•शहरातील खुली मैदाने, निर्मनुष्य रस्ते येथे वेगळाच गृहपाठ होतोय का ?
•दररोज 10 ते 12 जोडपे घेत आहे निर्मनुष्य रस्त्यांचा आसरा यावर आवर घालने गरजेचे.
अजय कंडेवार,वणी :- शहरातील नांदेपेरा रोडवर असलेले झुडूपयुक्त प्लॉट व वडगांव रोडवरील गजानन नगरी प्रेमी-युगलांसाठी सहारा (जणू काही वरदानच) देताना दिसून येत आहे.विशेष दररोज 10 ते 15 प्रेमीयुगल वडगाव रोडवर …Parents !!! “This” abode has become a bush resort for lovers-couples……
वडगाव फाटा येथे दररोज पेट्रोलिंग होने गरजेचे अन्यथा मोठी घटना होण्यास शक्यता टाळता येणार नाही. वणी शहरातील खुली मैदाने, निर्मनुष्य रस्ते, शाळांचे प्रांगण व सभोवताल असणारे राज्यमार्ग नवतारुण्यात येणाऱ्या जीवांकरिता स्वर्ग झाले आहे. पालकांनो सावधान, आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची हीच वेळ असून शिकवणीच्या नावाने वेगळाच गृहपाठ होतोय का? हे तपासणे आपलेच आद्य कर्तव्य आहे. 3 दिवसांपूर्वी वडगाव मार्गावरून चारचाकी वाहनाने दुपारी 1ते 4 वाजताच्या सुमारास 3 दुचाकी जात असताना 6 युगल झुडपाचा सहारा घेताना दिसले. त्यांचे वय अवघे 15 ते 20 वर्षाचे असावे.तसेच अनेक निर्मनुष्य रस्ते आहे त्यात वणी शहरात वडगाव रोड, भालर रोड, मुकुटबन मार्गावरील काही ले- आउट, नांदेपरा रोड वरील शाळांचे निर्मनुष्य प्रांगण, शहरातील खुली मैदाने प्रेमी युगलाना मौजमजेची स्थळं झाली आहेत.
“प्रतिनिधीने वडगाव फाट्यावर एका ढोरक्याला विचारणा केली असता त्याचे स्पष्ट म्हणणे पडले की,” भाऊसाहेब इथे दररोज 15 ते 20 प्रेमीयुगल येत असतात त्यात आम्ही क़ाय करणार ? ” आम्ही किती या लोकांना हटकनार सांगा? असा स्पष्ट भाषेत त्यांनी प्रतिनिधीला उत्तर दिले.”
आता महत्वाचे म्हणजे वडगाव रोडवर असलेले गजानन नगरी प्रेमी युगलांच्या अड्डाच बनला आहे त्यामूळे या भागाकड़े सम्बंधित प्रशासनाने लक्ष देण्याची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. काही अनर्थ होण्यापेक्षा इथे दररोज पेट्रोलिग होने अतिशय गरजेचे आहे व वडगाव फाटा इथे एक होमगार्डची व्यवस्था असणे अतिशय गरजेचे आहे.
वेळेवर उपाययोजना करण्यात आली नाही अनर्थ घडणार यात शंकाच नाही कारण
प्रतिनिधिने तिथे जाऊन शहानिशा केली असता तिथे अस्तव्यस्त स्थिती पाहुन प्रतिनिधी तेथून पुढे गेले .त्या अल्पवयीन प्रेमी की वासनाधीन युगलाना काही विचारावं तर ते आपल्यालाच प्रतिप्रश्न करतील म्हणून पुढे निघून गेले परंतु बराच वेळ ते चित्र मन अस्वस्थ करीत होते. आपला पाल्य काय करतोय हे तपासण्याचं सौजन्य पालक का दाखवत नाही हा चर्चेचा विषय झाला आहे. शिकवणीच्या नावाने वेगळाच गृहपाठ तर चालला नाहीना हे पालकांनीच काटेकोरपणे तपासणे आता गरजेचे झाले आहे व वडगाव फाटा इथे लवकरात लवकर होमगार्डची व्यवस्था करावी व पेट्रोलिग दररोज सकाळ,दुपार व सायंकाळी व्हावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे.