Tuesday, April 21, 2026
HomeUncategorizedपत्रकारांना दमदाटी' प्रकरणात नेत्यांना शिक्षा अनिवार्य?

पत्रकारांना दमदाटी’ प्रकरणात नेत्यांना शिक्षा अनिवार्य?

 •वणीत त्या "फट्टू नेत्याबाबत" चर्चेला ऊत

Ajay Kandewar, Wani :-अलिकडच्या काळात सोशल मीडियावर पत्रकारांना धमकावणे, त्रास देणे किंवा त्यांच्या कामाला अडथळा आणणारी काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. या पार्श्वभूमीवर अशी कृत्ये करणाऱ्या राजकीय नेत्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता वाढली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे संबंधित नेत्याना कायदेशीर चौकटीत शिक्षा होण्याची प्रक्रिया गतीमान होणार असल्याचे बोलले जात आहे. पत्रकार संघटनांनीही या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. माध्यम क्षेत्रावर दबाव टाकण्याचे प्रयत्न थांबले नाहीत तर कठोर उपाययोजना करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

एकूणच,“पत्रकारांना सोशल मीडियावर दमवणाऱ्यांना आता शिक्षा टळणार नाही” — अशीच चर्चा वणीसह जिल्हाभर वेगाने पसरत असून, प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page