•आज दू.4 .00 वाजता स्वागत समारंभ “टिळक चौकात”
अजय कंडेवार,वणी:- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. नागपूर च्या निवडणुकीत भरघोस मतांनी एकतर्फी “संजय खाडे”यांनी विजयी झाले.
महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. त्यामध्ये जिनिंग चे संचालक संजय रामचंद्र खाडे विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शेखर धोटे यांना 10 पैकी फक्त 3 मते मिळाली तर संजय खाडे यांनी 7 मते मिळवून विजय प्राप्त करीत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला व संचालकपदी निवडून आले. सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी फार तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे या क्षेत्राला महत्व प्राप्त झाले आहे.
यापूर्वी संजय खाडे यांनी वसंत जिनिंगच्या निवडणुकीत संचालकपदी विराजमान झाले तसेच पणन महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत संजय खाडे यांनी आपली छाप सोडली. त्यातही त्यांनी विजय मिळवला व पणन महासंघाचे संचालकपद खेचून आणले. वणी विभागामध्ये संजय खाडे यांच्या निवडीबद्दल कौतुक होत असुन विधानसभेमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संजय रामचंद्र खाडे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. नागपूर च्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल स्वागत समारंभ वणी येथील टिळक चौक येथे सायं 4 वाजता पार पडणार आहे .
“आपण दाखवलेल्या विश्वास आणि प्रेमामुळे पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत वणी झोनमधून विजय मिळवता आला. निवडणुकीसाठी मदत करणा-या सर्व सहका-यांचे, हितचिंतकांचे व मतदारांचे खूप खूप आभार.” – संजय खाडे