•निष्ठावानांना घेऊन शहर काँग्रेसची पक्षबांधणी
अजय कंडेवार,वणी:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणी शहर काँग्रेसने पक्षातील ज्येष्ठ,निष्ठावानांना घेऊन पक्ष बांधणीला सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून वरिष्ठांचा आदेशाने माजी आमदार वामन कासावार यांचा हस्ते नियुक्तीपत्र देत अब्दुल नईम अब्दुल अजीज यांची अल्पसंख्याक विभाग वणी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .(City Congress party building with loyalists Appointed to Naim Aziz)
शहर काँग्रेसतंर्गत असलेली गटबाजीची गल्लीपासून दिल्लीपर्यंत खमंग चर्चाच चर्चा…. पण पक्षाचे जुने, ज्येष्ठ व निष्ठावान पक्षापासून काहीं नाराज लोक दूर गेलेले आहे. मात्र, वरिष्ठांचा निर्देशानुसार आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणीचे काम सुरू आहे.यासाठी निष्ठावानांना सोबत घेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.
यासाठी अल्पसंख्याक विभाग वणी शहर अध्यक्ष म्हणून निष्ठावान अब्दुल नईम अब्दुल अजीज यांची वर्णी करण्यात आली. या निवडीने नईम अजीज यांनी नियुक्तीबद्दल माजी आमदार वामन कासावार व यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांचे आभार मानले. यावेळी समस्त काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.