अजय कंडेवार,Wani:- विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधूमाळी येत्या काही दिवसात सुरू होणार असून यासाठी वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शिरपूर, शिंदोला, कुरई, वेळाबाई, मोहदा, कायर या गावांमध्ये शिरपूर पोलीस प्रशासनाकडून ३.नोव्हें रोजी रुट मार्च करण्यात आला.
गुन्हेगार आणि सामाजिक तत्वांवर दबाव निर्माण करण्यासाठी शिरपूर पोलिस अनेक उपाययोजना करत आहेत. पोलिस ठाण्याचे हद्दीमध्ये ग्राम स्तरावरील महत्त्वाच्या मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढला. यामध्ये वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर ठाणेदार माधव शिंदे यांच्या नेतृत्वात केंद्रीय पोलिस दलाचे जवान, होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाचे जवान,असे एकूण ०२ अधिकारी, ३२+०१,७ पोलीस अंमलदारांचा समावेश होता.
•शिरपूर ठाणेदार माधव शिंदे यांचे आवाहन……
“निवडणूक कालावधीत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही व निवडणूक शांततेत पार पाडाव्यात याबाबत सूचना दिल्या. कायद्याचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे. कोणतीही व्यक्ती जातीय तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. जर कोणी सोशल मीडियावर एखादा मेसेज येत असेल व त्या मेसेजला एडिटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लाऊन आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांनी केले.”