• संत गाडगे महाराज यांच्या 67 व्या स्मृतिदिनाच्या औचित्य
.• नगर सेवा समितीचा 12 वर्षापासून सूरू हा स्तुत्यमय उपक्रम.
अजय कंडेवार,वणी:- संत गाडगे महाराज यांच्या 67 व्या स्मृतिदिनाच्या औचित्याने कडाक्याच्या थंडीमध्ये निवारा नसल्यामुळे रस्त्यावर मिळेल तिथे अंथरून पांघरून झोपणाऱ्या निराधार लोकांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लॅंकेटचे वाटप नगर सेवा समितीच्या वतीने १९ डिसें.रोजी रात्री करण्यात आले.
मागील बारा वर्षापासून दर रविवारी स्वच्छता अभियान, ब्लॅंकेट चे वाटप , अपंग लोकांना काठी वाटप, संपूर्ण शहरांमध्ये झाडे लावणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असते त्यापैकी संत गाडगे बाबा यांच्या स्मृिदिनानिमित्त ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोरील इमारती पासून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण शहरात फिरून वाटेल त्या ठिकाणी झोपून असलेल्या गरीबांना ब्लॅंकेटचे वाटप करीत मायेची ऊब म्हणून नगर सेवा समितीने लक्षात आणुन दिले.
तसेच वणी ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांना व गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप व फळवाटप केले. विशेषतः हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विजय चोरडिया यांच्या सौजन्याने करण्यात आले.यावेळी नगर सेवा समितीचे नामदेवराव शेलवडे, दिनकरराव ढवस, दिलीप कोरपेनवार, राजू तुरणकर, सागर मुने, विकास जयपूरकर, प्रदीप मुके, सागर जाधव, भास्कर पत्रकार, नितीन बिहारी व पांडुरंग मत्ते हजर होते.