•1 अटकेत ,10 हजारावर मुद्देमाल जप्त.
•यात एकाचा “मंगलही ” झाला का?
विदर्भ न्यूज डेस्क,वणी :– शहरात सुरु असलेल्या मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम व मटका लावण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई वणी पोलीस पथकाने केली.Raid on Matka Ada near Narayan Niwas.1 arrested, rupees 10,000 items seized ,Strong instructions from P.I Ajit Jadhav..
दि. 25 ऑगस्ट रोजी शहरातील सावरकर चौक येथील नारायण निवास जवळ रोडवर सार्वजनीक ठिकाणी मटका सुरु असल्याची माहिती वणी पोलीस पथकाला मिळाली. त्यावरून 25 ऑगस्ट रोजी सायंकाळचा दरम्यान सदर ठिकाणी धाड टाकली. धाड टाकताच तिथे एकच खळबळ उडाली. मटका लावणा-यांनी मिळेल त्या दिशेने पळ काढायला सुरुवात केली. दरम्यान या कारवाईत मटका पट्टी फडणारे मटका पट्टी उतारी घेणारा आरोपी इसम नामे आदील खान रफीक खान (वय 24 वर्षे) रा. नारायण निवास, वणी हा पोलिसांच्या हाती लागला.त्याचाकडून 2 मोबाईल व नगदी असा एकुण 10 हजार 570 रू मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
@ P.I अजित जाधव यांचा कर्मचाऱ्यांना कडक सूचना…..!
“सर्व आरोपीत इसमांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याची तजविन ठेवण्यात आली आहे”
सदर कारवाई गणेश कींद्रे (वणी पोलीस उपविभागीय अधिकारी) मार्गदर्शनाखाली वणी ठाणेदार P.I अजित जाधव यांचा आदेशावरून विकास धडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम, मोहम्मद वसीम यांनी केली आहे.