Tuesday, February 17, 2026
HomeUncategorizedनागपूर, वर्धा ,सावंगी नाही तर आता "वणीमध्येच" मोफत शासकीय आरोग्यसेवा सुरू.....

नागपूर, वर्धा ,सावंगी नाही तर आता “वणीमध्येच” मोफत शासकीय आरोग्यसेवा सुरू…..

Ajay Kandewar,वणी : आजारपण हे सांगून येत नाही, मात्र उपचार मिळाले नाहीत तर त्याची किंमत जीवावर बेतते. हीच बाब लक्षात घेऊन वणीतील लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून, वणी उपविभागातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांसाठी ही सेवा मोठा आधार ठरत आहे. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून येथे रुग्णांना आधुनिक वैद्यकीय उपचार एकही रुपया खर्च न करता उपलब्ध करून दिले जात आहेत.

आजवर या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना नागपूर किंवा चंद्रपूरकडे जावे लागत होते. प्रवासाचा खर्च, वेळ आणि असहाय्य परिस्थिती यामुळे अनेक जण उपचार टाळत होते. आता मात्र हीच सुविधा वणीमध्ये उपलब्ध झाल्याने उपचार वेळेत मिळू लागले आहेत. शासकीय योजनेंतर्गत सेवा देणारे वणी उपविभागातील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून लोढा हॉस्पिटलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या हॉस्पिटलमध्ये सामान्य आजारांपासून ते गंभीर स्वरूपाच्या उपचारांपर्यंत सर्व सोयी एका छताखाली उपलब्ध आहेत. हृदयरोग, फुफ्फुस व मेंदूविकार, डायलिसिस, संसर्गजन्य आजार, सर्पदंश, विषबाधा, संधिवात, अतिदक्षता विभाग, नवजात बालक व बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती, मुतखडा व मूत्ररोग तसेच अपघात व फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रिया अशा सर्व सुविधा आधुनिक यंत्रसामग्रीसह येथे सुरू आहेत.विशेष म्हणजे नागपूर व चंद्रपूर येथील अनुभवी व नामांकित तज्ज्ञ डॉक्टर ठरावीक दिवशी वणीमध्येच रुग्ण तपासणी करीत आहेत. त्यामुळे गंभीर आजारांचे निदान वेळेत होऊन रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज उरलेली नाही. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सुविधा एखाद्या जीवनदानासारखी ठरत आहे.आरोग्यसेवा केवळ हॉस्पिटलपुरती मर्यादित न ठेवता, लोढा हॉस्पिटलतर्फे लवकरच वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये तपासणी, आयुष्मान कार्ड काढणे आणि शासकीय योजनांचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

“गरिबीमुळे उपचार थांबू नयेत, हीच आमची भूमिका आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र रुग्णापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मत लोढा हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा यांनी व्यक्त केले.

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच कार्ड तयार करण्यासाठी रुग्णांनी थेट लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, शेतकरी मंदिर रोड, बसस्थानकासमोर, वणी येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 7743916588 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

वणी उपविभागासाठी लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ रुग्णालय न राहता, विश्वासाचे आणि आशेचे केंद्र बनत आहे. स्थानिक पातळीवर मोफत आणि दर्जेदार उपचार उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, या उपक्रमामुळे परिसरातील आरोग्यसेवेला नवी दिशा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments