अजय कंडेवार, वणी:- अतिवृष्टीमुळे ( rain) शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेली. शेतकऱ्यांनी कशीबशी हाती आलेली पण, चोरट्यांनी त्यावरही डल्ला मारला. ही घटना मूर्धोनी परिसरात घडली त्यात 7 क्विंटल कापूस चोरी गेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशन येथे नोंद आहे.
चोरट्यांनी आता शेतीमालाकडे मोर्चा वळवला आहे. मात्र आता चक्क गोठ्यात असलेल्या कापसावरचं अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना मुर्धोणी लगत अग्रवाल यांचा शेतात घडली. नेहमी प्रमाणे सालगडी शेतीचे कामे आटपून घरी यायचा दिनांक 5 डिसेंबर देखील सालगडीने शेतकामे केले व घरी झोपण्यास गेला असता जेव्हा तो सकाळीं जागली साठी सकाळीं शेतात गेला असता त्याला गोठ्यातील कापुस अस्तव्यस्त दिसून आला त्याने लगेच शेतमालकाला माहिती दिली असता ,विजय अग्रवाल आले आणि पाहणी केली त्यांना जवळपास 7 क्विंटल कापुस चोरी गेल्याचे निदर्शनात आले. त्याने वणी पोलीस स्टेशन गाठत रितसर तक्रार नोंदविले.
वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.