•प्लास्टिक निर्मूलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित
•न.प प्रशासनाकडून डोळेझाक
अजय कंडेवार,वणी :- शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केलेली आहे. मात्र प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीचे नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत सर्रासपणे प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसत असून थातूरमातूर कारवाई अधिकारी वर्ग चालढकल करताना दिसत आहे.
फेरीवाल्यांपासून दुकानदारांपर्यंत सर्वच व्यवसाय सर्रासपणे प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करताना दिसून येत आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शहरात शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक विक्री होताना दिसुन येत आहे व त्यांचा मोठ्या प्रमाणात ही वापर केला जात असून याकडे नगरपरिषद प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे.
मागिल काही महिण्याअगोदर नगरपरिषदेकडून फक्त नाममात्र कारवाया करण्यात आले आहे. फक्त शासनाचा अनादर करण्याकरिताच अधिकारी बसले की का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दिर्घ प्रतीक्षेनंतर मुख्याधिकारी लाभले मात्र काम शून्य ……त्यात काही शंका नाही . फक्त कार्यक्रमात उपस्थिती असणे आणि शहरांतील प्रतिष्टीतांशी संपर्क वाढविणे एव्हढ्याच कामाकरीता आले की काय असे नागरिकांना वाटू लागले आहे. परंतू काममात्र शून्य अशीही त्यांचा नावाची जोरदार चर्चा देखील शहरात सूरू आहे.