•7 लाखांचा निधी मंजूर : आ. बोदकुरवार यांच्या हस्ते भूमिपूजन.
अजय कंडेवार , वणी : तालुक्यातील धोपटाळा येथे स्थानिक विकास निधीअंतर्गत 7 लक्ष रूपयातून तयार होणाऱ्या गावातील सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन दिं 3 ऑक्टो 2022 ला वणी विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी आमदार बोदकुरवार यांनी रस्त्यांच्या माध्यमातूनच कोणत्याही क्षेत्राची प्रगती होते. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासनाचा निधी खर्च झाल्यास त्याचा लाभ मिळतो असे मनोगतही व्यक्त केले. गावातील जनतेने आनंदही व्यक्त केला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू चांदेकर (माजी जि.प.सदस्य) हे होते प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिनकर पावडे( माजी महामंत्री) विजय पिदूरकर (माजी जि.प.सदस्य), संजय पिंपळशेंडे (माजी सभापती पं. स, वणी),गजानन विधाते (तालुका अध्यक्ष, भाजपा) , गावातील सरपंच, उपसरपंच (ग्रा.प. घोपटाळा) व मारोती बोढाले (ग्रा.प. सदस्य) तथा समस्त गावकरी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

