• पाच जणांना अटक तर 3 लाख 60 हजार मुद्देमाल जप्त.
अजय कंडेवार,वणी : तालुक्यातील वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोपटाळा जंगल येथे लपून छपून कोंबडा बाजार भरवीत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना मिळाली.यावरून 19 मार्च 2023 ला सायं.4 चा सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे पोऊनी प्रविण हिरे व पोलीस कर्मचारी यांनी धोपटाळा गावातील सार्वजनिक ठिकाणी कोंबड बाजार भरलेला आढळला तिथे कोंबड्यावर झुंजी लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हार जितचा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसले.Raid on Dhoptala Chicken Market.
त्या कोंबड बाजारात अलीशा चंदुशा (53) रा. शास्त्री नगर, राजेंद्र विधाते (54) रा. पेटुर ,अजय कापसे (51) रा. वणी, अक्षय अंबादास झाडे (22) रा. मंदर,संतोष होलके (35) रा. वागदरा असे पाच जणांना अटक करून रोख रक्कम 3 हजार,9 दुचाकी वाहन, 4 मयत कोंबडे असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.Raid on Dhoptala Chicken Market.
सदर कारवाई सर्व वरिष्ठ व उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या आदेशाने प्रवीण हिरे (पोऊनि), सुनिल नलगट्टीवार,वसीम शेख ,भानुदास हेपट,महेश बाडलवार यांनी केली.