•वणी ठाणेदार P.I अजित जाधव यांचा आदेशाने कारवाई
अजय कंडेवार,वणी:- धारदार शस्त्र अवैधरित्या बाळगणा-या एका युवकाला P.I अजित जाधव यांचा आदेशाने वणी पोलिसांनी अटक केली आहे आरोपींचे नाव अरविंद केशव तांबे वय ४१ वर्षे रा. सेवानगर ता.वणी जि.यवतमाळ येथील आहे.पेट्रोलिंन करणाऱ्या पथकाने त्याच्याकडून धारदार शस्त्र (1 तलवार) जप्त केली आहे.Those who carry sharp weapons are stuck.Action ordered by Wani Thanedar P.I Ajit Jadhav
वणी येथील दिपक चौपाटी येथील दिपक बारजवळ एक इसम धारदार शस्त्र (तलवार) बाळगत चौकात माज माजवित असल्याची मिळाली होती. ही माहिती मिळताच पेट्रोलिन करणाऱ्या पथकाने दि.5 जूलैला दुपारी 2.30 वाजताचा सुमारास त्याठिकाणी जाऊन आरोपीला शिताफीने अटक केली. तो पोलीसांचे अटक चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याने सौम्य बळाचा वापर करून स्टापच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीकडून 1 धारदार तलवार जप्त करण्यात आली व पोलिसांनी खाकी दाखविताच कुणाकडून घेतली त्याबद्दलही माहिती घेणे सुरू आहे.
या युवकावर कलम 4/25 शस्त्र कायदा सहकलम महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही डॉ.पवन बनसोड (पोलीस अधिक्षक,यवतमाळ) पियूष जगताप (अप्पर पोलीस अधिक्षक, यवतमाळ),गणेश किन्द्रे (उप.वि.पो.अ.वणी) यांचे मार्गर्शनात ठाणेदार P.I अजित जाधव यांचा आदेशावरून वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.