• PSI प्रविण हिरे व त्यांचा चमूची कारवाई.
अजय कंडेवार,वणी:- धारदार शस्त्र अवैधरित्या बाळगणा-या एका युवकास पेट्रोलियम दरम्यान वणी पोलिसांचा चमूने अटक केली आहे आरोपींचे नाव सुमीत देविदास राखुंडे (वय २५ वर्ष ),रा.नटराज चौक,वणी जि.यवतमाळ येथील आहे.पथकाने त्याच्याकडून धारदार शस्त्र (1 तलवार) जप्त केली आहे.The person carrying the sharp weapon was arrested..Action by PSI Pravin Hira and team.
वणी येथील नटराज चौकात एक इसम धारदार शस्त्र (तलवार) अवैधरित्या घातकशस्त्र बाळगत असल्याची माहिती प्रविण हिरे व त्यांचा चमूला मिळाली होती. ही माहिती मिळताच प हिरे व पथकाने दि.11 जून मध्यरात्री 12.30 वाजताचा सुमारास त्याठिकाणी जाऊन आरोपीला शिताफीने अटक केली. तो पोलीसांचे अटक चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याने सौम्य बळाचा वापर करून स्टापच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीकडून 1 धारदार तलवार जप्त करण्यात आली व पोलिसांनी खाकी दाखविताच कुणाकडून घेतली त्याबद्दलही माहिती दिली.
या युवकावर कलम 4/25 शस्त्र कायदा सहकलम महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही डॉ.पवन बनसोड (पोलीस अधिक्षक,यवतमाळ) पियुष जगताप (अप्पर पोलीस अधिक्षक, यवतमाळ),गणेश किन्द्रे (उप.वि.पो.अ.वणी) यांचे मार्गर्शनात ठाणेदार P.I प्रदिप शिरस्कर यांचे आदेशावरून PSI प्रविण हिरे,वसिम व श्रीनिवास यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास PSI प्रविण हिरे हे करीत आहे.