•वणी येथील घटना
अजय कंडेवार,वणी:- धारदार शस्त्र (सत्तुर) हातात
घेऊन रस्त्यावर दहशत पसरविण्याऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे.साहील संजय कामटकर (19) गायकवाड फैल,वणी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून धारदार शस्त्र (सत्तूर) जप्त केली आहे.
शहरातील गायकवाड फैल येथे एक युवक हातात धारदार शस्त्र हातात घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच डी. बी पथकाने सायंकाळीं 6 वाजता दरम्यान त्याठिकाणीच आरोपीला शिताफीने अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून जवळ एक लोखंडी मुठ असलेला धारदार सत्तुर जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3)अन्वये जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. असे असतांना हातात सत्तूर घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकावर कलम 4/25 शस्त्र कायदा सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पो.नि प्रदिप शिरस्कर ठाणेदार पो.स्टे. वणी यांचा मार्गदर्शनात, डी.बी पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे, सुदर्शन वानोळे,सुहास मंदावार, विठल बुरूजवाडे, हरीन्द्रकुमार भारती,सागर सिडाम, पुरूषोत्तम डडमल यांनी केली.