•युवासेना उपतालुका प्रमुखाचा निवेदनातून इशारा …
अजय कंडेवार,वणी:- ग्रामपंचायत मुंगोली येथील सदस्य पद रिक्त झाल्याचा अहवाल 19 ऑक्टो.2023 रोजी ग्रा. सचिव यांनी पंचायत समितीला सादर केले परंतु तेथील अधिकाऱ्यानी निवडणूक विभागाकडे न पाठविल्यामुळे या प्रकरणात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, याकरिता उबाठा गटाचे युवासेना उपतालुका प्रमुख आयुष ठाकरे यांनी B.D.O किशोर गज्जलवार यांना ता.3 जाने 2024 देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
ग्रामपंचायत मुंगोली येथील वार्ड क्रमांक ०३ (अनुसूचित जमाती महिला) चे सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्या रेश्मा शंकर आत्राम यांची मौजा मुंगोली येथील मिनी अंगणवाडी सेविका या पदावर नियुक्ती झाल्याने तसेच शासन निर्णयानुसार एकाचवेळेस दोन पदावर राहता येत नसल्याने त्यांनी आपला सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यानुसार मुंगोली ग्रा.पंचायत सरपंच व सदस्य पद 10 ऑक्टो 2023 रोजी रिक्त झाले. ग्रा.पं सचिव यांनी हा अहवाल 19. ऑक्टो 2023 रोजीच वणी पंचायत येथे सादर केले . असे निवेदनातून म्हटले आहे तरीही हा अहवाल तयार करून निवडणूक विभागाकडे न पाठविल्यामुळे यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, याकरिता उबाठा गटाचे युवासेना उपतालुका प्रमुख आयुष ठाकरे यांनी B.D.O किशोर गज्जलवार यांना निवेदन देत, या प्रकरणात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असे न झाल्यास कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया….
” मुंगोली ग्रा. पंचायत सरपंच रिक्त पदाचा अहवाल मागिल तारखेत सचिवाकडून वणी पंचायत समितीला प्राप्त झालेला नाही. त्यामुळें सरपंच रिक्त पदाचा प्राप्त न झालेला अहवाल तहसिलदार यांना पाठविले नाहीं परंतु ता.3 जाने.2024 ला सचिव यांनी मुंगोली सरपंच रिक्त पदाचा अहवाल वणी पंचायत समितीत सादर केलेला आहे, त्याकरिता माहितीसाठी हा अहवाल निवडणूक विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.”
– बी. एन. जाधव,(विस्तार अधिकारी, पं .स. वणी)