•एक “फुल” दोन माली अब “एक”गया खाली-पिली
•अद्यापही मृत व्यक्तीची ओळख पटली नाही तरीही पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला.
अजय कंडेवार,वणी:- माणूस हा कमावणारा, धडपड करणारा. कसा तरी संसाराचा डोलारा सांभाळणारा.! पण जीवनाचा अंत कसा होतो. असच या घटनेत चला पाहूया… एक प्रियकर असताना या “मनिषाला (बदलेले नाव)” दुसराही आवडू लागला तेव्हढ्यातच संपत नाही तोपर्यंत अनोळखी सोबत राहू लागला . ही “ मनीषा “ प्रियकरासोबत ती वेळ घालवायची, तिला प्रियकरांची एवढी गोडी लागली की तिला तिच्या आयुष्यात अडथळा कोण हेच नाही कळू लागले. ज्याने तिला “बदळले” त्याचाचं काटा काढण्याचा मार्गावर राहू लागली. या “मनिषाने “ 2 प्रियकराच्या मदतीने अनोळखी मृतक व्यक्तीचा गेम करण्याचा प्लॅन रचलाच. त्यातीलच एक प्रियकर मारोती लक्ष्मण कुळमेथे (वय ३४ वर्ष रा. गणेशपुर, वणी) त्याच्या एक मित्र अनिकेत दादाराव कुमरे (वय २१ वर्ष रा. सिंधी ता. मारेगाव) ला सोबत घेऊन तहसील आवाराजवळ बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी आला व खूप तावात येऊन प्रियकर, मित्र व “ त्या मनीषाने ” अनोळखी मृतकाचा डोक्यात एका जाड वस्तूने प्रहार, लाथाबुक्क्यांनी मारहाण व शरीराचा मुख्य भागावरही प्रहार करीत या तिघांनी त्याचा जागीच मुडदाच पाडला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात ही धक्कादायक घटना काल दि.20ऑगस्ट रोजी घडली परंतू महत्वाची बाब ही की, मृतकाची ओळख अद्यापही पटली नसली तरीही वणी पोलिसांनी तपासचक्रे जलद गतीने फिरवीत या गुन्ह्याचा छडा अवघ्या 2 तासातच लावला. या कामगिरीबद्दल Dysp गणेश किंद्रे व P. I अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीसांचे शहरात कौतुक होत आहे हे विशेष ही.Even though the identity of the dead person has not yet been identified, the police have solved the crime.सविस्तर वृत्त असे की,…….
वणी पोलिसांनी आरोपी “ मनीषा” तिचा पहिला प्रियकर मारोती लक्ष्मण कुळमेथे आणि त्याच्या एक मित्र अनिकेत दादाराव कुमरे (दुसरा प्रियकर) याप्रकरणी या तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “ मनीषा “ हीचे काही वर्षांपासून प्रियकर “मारोती “व आणखी एका मित्राशी “ अनिकेत” याच्याशी चांगलेच गप्प संबंध होते. पण “मनिषाला “ असे नवीन काहीच नव्हते. त्याकाळात तिला या दोन प्रियकरसोबतच नवनवीन “मनिषाला “प्रियकर सोबत ठेवण्याची गोडी लागली. या दोघांचे प्रेम जडले परंतु या दोन प्रियकरपेक्षा तिला हा काही वेळासाठी अनोळखी मृतक जवळचा वाटू लागला होता. पण त्या घटनेचा रविवारी रात्री दि.20 ऑगस्ट रोजी “मनीषा” व (अनोळखी मृतक) यांचात पैश्याबाबत कडाक्याचे भांडणही झाले. या भांडणातून प्रेयसीने त्याचा काटा काढायचा तिने प्लॅनही रचला. या भांडणात “त्या” दोन प्रियकराने उडी घेतली तूने “मारा कैसे और हमारे दे पैसे “ म्हणून आणखी रात्री भांडण वाढत गेले शेवटी “मनीषा “, प्रियकर व मित्राने त्या अनोळखी मृतकाचा डोक्यावर एका जाड वस्तूने, लाथाबुक्क्यांनी व मृतकाचा प्राइवेट पार्ट वरही जोरदार प्रहार केले. या भांडणात अनोळखी मृतकाचा जागीच मृत्यू झाला. या खुनाचा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.परंतु आदी याच प्रकरणी वणी ठाण्यात दि. 21 ऑगस्ट रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद ही करण्यात आली होती. मात्र हा मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्याने परिसरात तर्कवितर्क लावल्या जात होते. परंतु Dysp गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात वणी ठाणेदार P. I अजित जाधव यांनी तपासाला अधिक गती दिली. त्या चौकशीत हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या झाल्याचे निष्फनही झाले. परंतु खून कुणी केला याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. वणी पोलिसांना “मनीषा” बाबतची या प्रकरणात थोडीशी कुणकुण लागली होती. त्यामुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता ती उडवा उडवीची उत्तरे देऊ लागली. संशय वाढल्याने तिचा दोन्ही प्रियकर आरोपींना अवघ्या 2 तासात ताब्यात घेउन पोलिसांनी चौकशी केली, त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिल्याने पोलिसांनी अनिकेत दादाराव कुमरे (वय २१ वर्ष रा. सिंधी ता. मारेगाव), मारोती लक्ष्मण कुळमेथे (वय ३४ वर्ष रा. गणेशपुर, वणी), “मनीषा ” या तिघांविरुद्ध भां. द. वी. कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही डॉ.पवन बन्सोड (पोलीस अधिक्षक यवतमाळ)पियुष जगताप (अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ) गणेश किंदे (उप वि.पो.अ. वणी) यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो. नि. अजित जाधव यांचे आदेशावरून सपोनि राजेश पुरी, माया चाटसे, माधव शिंदे सपोउपनि सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, पंकज उंबरकर, वसीम शेख, विशाल गेडाम, गजानन कुळमेथे व विकास धाडासे यांनी केली. सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार पोनि अजित जाधव हे करीत आहे.