•नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन.
अजय कंडेवार,वणी :- जिल्ह्यात आज 7 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी वादळी, तर काही ठिकाणी तुरळक व हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वादळी वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी व जनतेनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Chance of rain with stormy wind for two days.
याअनुषंगाने, नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी. पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता वीजगर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीत मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरु असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठ्यामध्येच चारा व पाण्याची उपलब्धता करुन द्यावी.