Friday, June 12, 2026
HomeBreaking Newsदोन्ही "संजय" ची आक्रमक शैली अन् उबाठा गटाचा वाढता प्रभाव ....

दोन्ही “संजय” ची आक्रमक शैली अन् उबाठा गटाचा वाढता प्रभाव ….

•येत्या निवडणुकीत "उबाठा गट" हा किंगमेकर . •वणी विधानसभेत ठरणार ताकदवान पर्याय.

Ajay kandewar, Wani :- तालुक्यातील राजकारणात उबाठा गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गावोगावी होत असलेले मेळावे, बैठका आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहता, येणाऱ्या निवडणुकीत या गटाचा प्रभाव निर्णायक ठरणार यात शंका नाही.

युवक, शेतकरी, महिला आणि कामगार वर्ग या गटाभोवती मोठ्या संख्येने एकवटत आहेत. येत्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याची तयारी या गटाने केली असून, स्थानिक पातळीवर जनतेच्या प्रश्नांवर दिलेली भूमिका त्यांना अधिक लोकप्रिय बनवत आहे.राजकारणातील जुने समीकरणे मोडून, नवीन घडामोडींना चालना देण्याची ताकद उभाठा गटाकडे आहे. विशेष म्हणजे, या गटाचा प्रभाव वाढताच विरोधकांच्या कपाळावर आठ्या उमटल्याचे स्पष्ट दिसते.

“उबाठा गट हा फक्त गट नाही, तर जनतेच्या विश्वासाचा आधार आहे” असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो. “येत्या निवडणुकीत उबाठा गट हा किंगमेकर ठरणार, यात कोणतीही शंका नाही” अशी चर्चा गावागावात रंगली आहे.अखेर, उबाठा गट आमदार संजय देरकर मार्गदर्शनाने जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांचा नेतृत्वात हा गट राजकारणात किती दूरवर झेपावतो, हे आगामी निवडणूकच ठरवणार आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे – या गटाकडे पाहिल्याशिवाय कोणतेही राजकीय गणित मांडणे आता अशक्य आहे!

• वणी विधानसभेत दोन “संजय” हे समीकरण चर्चेत…

वणी विधानसभा  राजकारणात आता “दोन संजय” हे समीकरण चर्चेत आलं आहे.आमदार संजय देरकर यांचा वाढता प्रभाव आणि दुसरीकडे स्थानिक नेतृत्वात सक्रीय असलेले यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचा जनसंपर्क – या दोन्हींचा लाभ उबाठा गटाला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मिळू शकतो, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page