• दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश.
माणिक कांबळे/मारेगाव:- वर्धा नदीवर देवकार्य करताना आंघोळीसाठी गेलेला भाविक बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मात्र यातील दोघांना नदी बाहेर काढण्यात यश आले आहे.Death of a devotee who went for a bath while performing devotional service ,Succeed in getting both safely out.
आदिवासी बांधवाचा देव उत्सव गेल्या काही दिवसापासून सुरु होता अशातच काल वर्धा नदीवर देवाना आंघोळ घालून समारोप करीत असताना एका युवा भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. विवेक अमर येडमे (20)असे नदीत बुडून मृत्यू पावलेल्या युवा भाविकाचे नाव आहे. घटनेच्या वेळी आदिवासी समाज बांधव वर्धा नदीवर सामूहिक पद्धतीने देवाच्या आघोळीसाठी गेले होते. यापैकी तिघे भाविक नदी पत्रात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोलवर वाहवत गेले. याच क्षणी उपस्थित असणाऱ्या काही भाविकांनी त्यांना वाचविण्यासाठी नदीपात्रा झेप घेऊन दोघांना नदी बाहेर काढण्यात यश आले मात्र या पैकी एक भाविक एकदम खोल पाण्यात वाहवत गेल्या मुळे त्याचा करून अंत झाला आहे.त्याचा शोध घेतल्या नंतर उशीरा त्याचा मृतदेह नदीत काही अंतरावर आढळून आला असून घटना स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तनीय तपासणी करिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मारेगाव तालुक्यातील सावंगी येथे वर्धा आणि वना नदीचा संगम आहे. अनेक जण धार्मिक संस्कार करण्यासाठी या संगमावर येत असतात. वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ अशा तीन जिल्ह्यांची सीमा या संगमावर आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील दिंदोड़ा घाटावर वरोरा तालुक्यातील बामर्डा येथील आदिवासी समाज बांधवाचे देवकार्य होते. गावातील सर्व समाज बांधव देव आंघोळ घालण्यासाठी येथील संगमावर जमलेले होते. या कार्यक्रमात मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील येडमे कुटुंबीयही सहभागी झाले होते.वर्धा नदीच्या संगमावर हे भाविक देवाच्या आंघोळीसाठी पाण्यात उतरले होते.या पैकी तिघे भाविक गटांगळ्या खात असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला.या शर्थीच्या प्रयत्नात दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र विवेक अमर येडमे (20)याचा ऐन वेळी हात सुटल्याने तो पाण्याच्या प्रवाहात बुडाला होता त्याचा बराच वेळ शोध घेतल्यानंतर काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
सततच्या पावसाने केला घात;-
” मागील आठ ते दहा दिवसापासून सर्वत्र सुरु असलेल्या पाऊसा मुळे पाण्याची पातळी वाढली आहे.नदी नाल्याना पूर सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे देवाची आंघोळ करताना नदीमध्ये उतरलेल्याना भाविकांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे.तसेच रेतीच्या अवैध उपस्याने जागोजागी खड्डे पडलेले आहे. त्यामुळे आंघोळीला जाणाऱ्या व्यक्तींना पाण्याचा अंदाज येत नसल्याने असे दुर्दैवी प्रसंग घडत असल्याचेही सांगितले जाते.”
सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना शून्य;-
“दरवर्षी आदिवासी बांधव वैशाख पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा दिवसावर कुलदैवत महोत्सव आयोजित करतात देवाची आंघोळ ते नदीपात्रा करून दुसऱ्या दिवशी देव थंड करून गावाशेजारील मोहाच्या झाडावर ठेवतात ही परंपरा आहे. असे असताना मात्र गेल्या काही दिवसा पासून अवकाळी पावसाने मोठया प्रमाणात कहर केला असून पाण्याची पातळी नेहमी पेक्षा वाढली आहे. हा समाज बांधव पारंपरिक पद्धतीने नदीवर येऊन आघोळी करतात याची जाणीव ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासना कडून उपाय योजना करणे गरजेचे होते मात्र तसे न केले गेल्याने अनर्थ घडण्याची शक्यता आहे.”