•शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा
नागेश रायपूरे, मारेगाव :– शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले जाते, मात्र मात्र हा जगाचा पोशिंदा आफाट काबाडकष्ट करुन, उन वारा अंगावर झेलून शेतात राबतो मात्र त्याच्या आयुष्यातील संकटे काही केल्या संपताना दिसत नाहीत… त्याला धड निसर्गाचीही साथ मिळत नाही, अशा सर्व बाजूंनी होणाऱ्या कोंडीमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात अशीच एक घटना मांगरूळ ( ता. मारेगाव ) येथे घडली आहे.Unfortunate! Damage to the farm and ….!
मांगरुळ ( ता. मारेगाव ) येथील युवा शेतकरी प्रफुल मोरेश्वर खडसे (वय. 31) असे त्यांचे नाव असून त्याला काही एकर कोरडवाहू शेती आहे.या युवा शेतकऱ्याने शेतमालाचे झालेले नुकसान व आदी बाबींना कंटाळून एका शेतात रविवार (ता. 19 मार्च) सकाळचा सुमारास विहीरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. Unfortunate! Damage to the farm and ……….!
मारेगाव पोलिस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस करीत आहे. यांच्या पश्चात आई,पत्नी,भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.