•कायर- मुकुटबन येथील घटना.
अजय कंडेवार,वणी:– “काळ आला होता पण वेळ नव्हती, असे आपण ऐकतो, पण असाच प्रकार शनिवारी (ता.3 सप्टें.) उमरी ता. वणी येथील कायर- मुकुटबन राष्ट्रीय महामार्गवर रस्त्याचा कडेला असलेले बसस्थानका जवळ उभा असलेला पीक अप वाहनाला थेट भरधाव ट्रकने उडविल्याची थरारक घटना उमरी फाट्याजवळ घडली. पीकअप मधील ड्रायव्हर हा सुदैवाने वाचला पण ट्रकचालक हा अतिशय गंभीर जख्मी झाल्याची माहिती मिळाली आहे.
असा घडला प्रकार दुपारी 12 वाजता मुकुटबन मार्गावरून वणीचा दिशेने खाली जाणाऱ्या मालट्रक (क्रमांक एमएच ४०सिडी ९३४१ ) या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने १२ टायरचा अवजड ट्रकने रस्त्यापासून 50 मीटरवर उभा असलेला पीक अप वाहन उमरी फाट्यावर उभा होता.त्याला थेट मुकुटबन कडून येणाऱ्या या ट्रकने जबर धडक दिली व बसस्थानकावर जाऊन आदळला. त्या बसस्थानकाचा बाजुला उघड्यावर असलेल्या दुकानाचे नुकसान झाले व उभा असलेला पिक अप हा चार ते पाच फुटचा अंतरावर फरफटत जाऊन हा भरधाव अपघाग्रस्त ट्रक थांबला. त्या पिक अपचेही अती नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
विशेष अशी माहिती आहे की, पिक अप चालक हा आपले वाहन उभे करून अपघाताचा 2 मिनिटापूर्वी बसस्थानाकाजवळील एका दुकानात पाणी पिण्यासाठी उतरला होता. तेवढ्यातच एक भरधाव ट्रक मुकूटबनचा दिशेकडून येणाऱ्या ट्रकचा तोल सुटला व त्याने उभ्या असलेल्या थेट पिकअपलाच उडविले.त्यामुळे सुदैवाने उभ्या असलेल्या पिक अपचा चालकाचे प्राण वाचले. ट्रक चालक हे जखमी असून त्यांला रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपासाठी अद्यापही कुणीही पोहोचले नसल्याचे वृत्त आहे.