•सुदैवाने जीवितहानी टळली.
अजय कंडेवार,वणी:- वणी बायपास रस्त् यावर अनेक अपघात झाले त्यातच आणखी एक सिमेंटनी भरलेला ट्रक दुभाजकाला जाऊन आदळल्याने पलटी झाल्याची घटना दि.3 ऑक्टोंबर ला रात्री चा सुमारास घडली. चालक जखमी झाला मात्र सुदैवाने या मार्गावरील मोठी जीवितहानी टळली. Wani-news-accident-news-bypaas highway-truck-accident
वणी तालुक्यातील चिखलगावाजवळ बायपास महामार्गावर मध्यभागीच ट्रक क्र MH-34-BG 4309 हा ट्रक दुभाजकाला आदळल्याने पलटी झाल्याची घटना दि.3 ऑक्टोंबर रोजी रात्री घडली आहे. या अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ पुढील बचावकार्य करण्यात आले. ट्रक चालकाला रुग्णालयात पाठविण्यात आले.