अपघात मालिका सुरूच…., 2 ठार तर 1 गंभीर जखमी.
•कार मालककाचे नाव अद्यापही गुलदस्त्यातच.
अजय कंडेवार,वणी:- वणी वरोरा रोडवरील नायगाव जवळ कार व दुचाकीची धडकेने 2 ठार तर 1 जखमी झाल्याची घटना आज दिनांक २८ फेब्रुवारी मंगळवार रोजी सायं. 6 चा सुमारास घडली.
वणी येथील दुचाकीवर तीन युवक वरोरा येथे एका कार्यक्रमाकरीत गेले होते. कार्यक्रम आटोपून वणीकडे दुचाकीने येत असताना नायगाव जवळ वणी कडून जाणारी कार क्रमांक एमपी48 झेडए 2249 व दुचाकीची क्रमांक एमएच 29 बीजी- 5124हे एकमेकांसमोर जाणारी कार व दुचाकीची समोरा समोर धडक दिल्याने मयत आकाश गाउत्रे (वय २८ वर्ष) हा जागीच ठार झाला तर अमन मडावी (वय २९ वर्ष) याला ग्रामीण रूग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
तर रानू तुमाराम (वय २७ वर्ष) हा गंभीर जखमी झाला आहे. ही धडक एव्हढी जबर होती की, कारचा बॉनेट व समोरील दुचाकीचा चुराडा झाला.वणी परिसरातील वाढत्या अपघाताने चिंतेचा विषय झाला आहे.
या घटनेची माहिती वणी पोलिसांना पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह व जखमीला वणी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.