•P.I अजित जाधवांची ‘ऍक्शन ‘B’ टीम’ लागली कामी.
अजय कंडेवार,वणी:- अवैधरित्या धारदार शस्त्र हातात घेत प्रेमनगर येथे माज माजवित असतांना दोन युवकाला वणी पोलिसांचा चमूने अटक केली आहे. आरोपींचे नाव तेजस मनोज भगत (वय 19 वर्षे) रा. भिमनगर वणी ,साहील विरेन्द्र खडसे (वय 19 वर्षे) रा. सम्राट अशोक नगर ,वणी हल्ली मुक्काम दामले फैल असे आहे. पथकाने त्याच्याकडून धारदार शस्त्र (1 चाकू) जप्त केली आहे.
वणी येथील प्रेमनगर येथे दोन इसम धारदार शस्त्र (चाकू) बाळगत महिला व पुरुषांवर चाकूचा धाक दाखवित माज माजवित असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने दि.9.सप्टें.3.30 वाजताचा सुमारास त्याठिकाणी जाऊन आरोपीला शिताफीने अटक केली. ते दोघेही पोलीसांचे अटक चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याने सौम्य बळाचा वापर करून स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीकडून 1 धारदार चाकू व वापरण्यात आलेली दुचाकी क्र. MH -29-BS-4213 अंदाजे किंमत 30,000 असा एकूण मुद्देमाल 30,500 रू जप्त करण्यात आली . तसेच दोन्ही आरोपिंविरुद्ध पोलीस स्टेशन वणी येथे विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किन्द्रे यांचे मार्गदर्शनाखाली P.I अजित जाधव, PSI आसोरे तसेच पोलीस जमादार विकास घडसे, मो.वसीम, शुभम सोनुले, सागर सिडाम, सुनील नलगंटीवार यांनी पार पाडली आहे