सामान्यांनी जगायचे तरी कसे?
•घरगुती गॅससाठी 1150 रुपये.
अजय कंडेवार,वणी:– दिवसेंदिवस महागाई आक्राळ विक्राळ रूप धारण करत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच चालले आहे. त्याचप्रमाणे घरगुती एलपीजीच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. आज एलपीजी सिलिंडर 1150 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
विशेषतः मध्यम आणि गरीब कुटुंबांना आता सिलिंडर रिफिलिंगसाठी विचार करावा लागणार आहे. कारण रोज 300 रूपये कमावणाऱ्या कुटुंबातील प्रमुख चार दिवसांची मजुरी देऊन सिलिंडर घेणार, मग उरलेली आणायचे ? असा गहण प्रश्न आहे. त्यामुळे चहुबाजूने ग्राहक डाळ, तेल, मीठ वगैरे कुठून सर्वसामान्य गरिबांना पडला व सर्व सामान्य माणसालाच आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
सामान्यांनी जगायचे तरी कसे?
एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे तोडणे बंद करण्यात आले आहे. जंगलातून सरपण आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही जंगलात जाणाऱ्यांसाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सिलिंडरच्या किमती हजारांच्या पुढे गेल्याने त्यांचे जगणे कठीण झाले आहे. मोफत आणि अनुदानित उज्ज्वला योजना यापूर्वीच गुंडाळण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या घराघरात उज्ज्वला गॅस कनेक्शनची जोडणी शोभेची वस्तू बनली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.