•गैरकृत्य करणाऱ्याची गय केली जाणार नाही- संजय पुज्जलवार (डीवायएसपी, वणी)
अजय कंडेवार,वणी:– नवीन वर्ष 2023 च्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे, वणी तालुक्यात विविध भागात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी DJ नाईट्स, खाण्यापिण्या चे आयोजन आलेले असतात असून त्याठिकाणी बेकायदेशीर कृत्य होऊ नये यावर वणी पोलिसांची करडी नजर आहे.
सध्या जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली असून नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित तरुणाईच्या कार्यक्रमात अंमली पदार्थाचा वापर होऊ नये यासाठी पोलीस चहू बाजूने नजर ठेवून आहे न्यू ईयर सेलिब्रेशन.
शहरातील आतील व बाहेर, ढाबे,हॉटेल्स, लॉन अश्या ठिकाणी कपल्स साठी कार्यक्रमाचे आयोजन असतात. मात्र त्याठिकाणी मादक पदार्थांचे सेवन होऊ नये अश्या सूचना वणी पोलिसांतर्फे आयोजकांना देण्यात आल्या असून जर कुठेही बेकायदेशीर कृत्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली तर आयोजकांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अशी माहिती वणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी दिली आहे.