Tuesday, July 15, 2025
Homeवणीथरार....पार्कींग मध्ये उभ्या कारने घेतला पेट!

थरार….पार्कींग मध्ये उभ्या कारने घेतला पेट!

•जवळपास पाच लाखांचे नुकसान

अजय कंडेवार,वणी:- शहरातील नगरपरिषद लगत असलेल्या पार्किंगमध्ये थांबविण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारला मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे दिसून आले. यामध्ये कारचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.Thrill…. The parked car caught fire in the parking lot!Loss of around five lakhs.

गांधी चाैकालगत असलेले नगरपरिषद च्या बाजूला चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी पार्किंगमध्ये एका चंद्रपूर येथील सुधाकर गोवारदिपे रा.उर्जानगर,चंद्रपूर येथील परिवार या चारचाकीने मुलीचा लग्नाचा शॉपिंग करीता आले. अशी माहिती मिळाली.ही कार (एम.एच. 34 -AA-7489) पार्किंग मध्ये ठेवण्यात आली दरम्यान, दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास अचानक बोनेटमध्ये पेट घेतल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

ही आग नेमकी काेणत्या कारणाने लागली, हे मात्र समजू शकले नाही. कारला आग लागल्याने परिसरातील व्यापारी, नागरिकांनी एकच गर्दी केली. कांहीनी पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीमध्ये कारचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आतील भाग बोनेट पूर्णत: खाक झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच गांधी चाैक येथील नगर परिषदचे अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व आगीवर नियंत्रण करण्यात आले. त्यांनी पाहणी केली असून, आगीच्या कारणाचा शाेध घेतला जात आहे. या घटनेत कारचे जवळपास 5 लाखांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा शाेध घेतल्या जात आहेत

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments