माणिक कांबळे /मारेगाव :- विद्युत प्रशासनाच्या उदासीन धोरनामुळे विद्युत ग्राहक शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहे. येत्या 5 दिवसात विद्युत महावितरणामधील भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लागल्या नाही तर आम्ही सर्व शेतकरी उपोषणास बसू असा इशारा त्रस्त शेतकऱ्यांनी एका लेखी निवेदनातून महावितरण कपंनीला दिला आहे.
तालुक्यातील केगांव मार्डी ए जी (AG) ग्राहकांना गेल्या काही दिवसापासून महावितरण कंपनीच्या विविध समस्येला तोंड दयावे लागत आहे. भेडसावत असलेल्या दैनंदिन समस्यामुळे शेतकरी तथा ग्राहकांना आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे केगाव AG वरील लोड रिलीफ मिळावा, विद्युत कर्मचाऱ्यामध्ये वाढ करावी, पावसा पूर्वी विद्युत खांबा मधील झाडे कटाई करावी, झुकलेली सर्व पोल दुरूस्ती करावी,सर्व डी.बी. स्टक्चरवर ए.बि.स्विच लावुन घेण्यात यावी, सर्व वितरण बाक्सची दुरूस्ती करण्यात यावी, समस्याग्रस्त ग्राहकांचा फोन न उचलणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.या सह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
या सर्वच मागण्या विद्युत ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीने महत्वाच्या असुन त्या तात्काळ सोडविल्या जाव्या अन्यथा पुढील पाच दिवसात सर्व शेतकरी आपले कार्यालया समोर उपोषण करेल असा इशारा त्रस्त शेतकऱ्यांनी म रा वि वि कं. मर्या. मारेगाव यांना दिलेल्या एका लेखी निवेदनातून दिला आहे.निवेदनावर गजानन मत्ते, जयंत देऊळकर, उदय खीरटकर, यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत.