•कायर ग्रामपंचायत निवडणुक शांततेत मतदान…!
अजय कंडेवार,वणी :– तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ‘सेनेचा गड’ समजल्या जाणार्या व कायर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान झाले.
ग्रामपंचायतीच्या थेट 3 सरपंच व 28 सदस्य जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 81.32 टक्के मतदान झाले असून 1955 मतदारांपैकी 1590 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर वॉर्ड क्रमांक 1 मधे 612 , वॉर्ड क्रमांक 2 मधे 490, व वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 488 इतके मतदान झाले. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. सकाळपासूनच गावांत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. गाव विकास परिवर्तन पॅनल व जनशक्ती पॅनल तर शिवभक्त ग्रामविकास आघाडी अशी लढत होती. आता मतदारांनी कौल कुणाला दिला ? याचा दि. 20 डिसें , मंगलवार रोजी होणार आहे. त्यामुळे कोणता उमेदवार बाजी मारणार याचीच उत्सुकता लागली आहे.
दरम्यान मतदान केंद्राबाहेर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचा मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अमोल कोवे(नाईक पोलीस शिपाई), अनिल सुरपाम (नाईक पोलीस शिपाई), अभिजित कोषेटवार (नाईक पोलीस शिपाई), दोन होमगार्ड, पांढरकवडा येथील पोलिस कर्मचारी , SRPF टीम व आदी कर्मचारी उपस्थित होते.