•सरपंच अजय कवरासे यांच्या PWD ला अल्टिमेटम…..
अजय कंडेवार, वणी :- वेळाबाई फाटा ते कुरई, ढाकोरी, बोरीचा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत असुन सदर रस्त्यावर २ ते ३ फूट खोलाचे खड्डे पडले आहे.या अरुंद खड्डे पडलेल्या रस्त्यांवरुन वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. या रस्त्यावरुन वाहने संथगतीने चालविली जात असल्याने मानवी लचके देखील तूटत आहे व या रस्त्यावर खड्ड्यांमुळे कोंडी देखील निर्माण होते. यामुळे हे खड्डे तात्काळ बुजविण्याकरीता सरपंच अजय कवरासे यांनी उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम, विभाग, वणी) यांना दिनांक 12 सप्टे रोजी निवेदनाने साकडे घातले आहे.
तालुक्यात कोळसा,डोलोमाईट चुना, बेसाल्ट इत्यादीच्या भरपूर खाणी आहेत. या खाणीमधून निघणान्या कच्चा पक्का मालाची वाहतूक रा.म.३७४ मार्गाने होत असतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे .या अरुंद खड्डे पडलेल्या रस्त्यांवरुन वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. या रस्त्यावरुन वाहने संथगतीने चालविली जात असल्याने या रस्त्यावर खड्ड्यांमुळे कोंडी होते.तसेच मोठ्या प्रमाणात खड़े असल्याने राज्य परिवहन विभागाने बसच्या फेऱ्या कमी केल्या, अशीच जर परीस्थिती राहिली. याकरिता ग्रामपंचायतला देखिल पत्राद्वारे रा. प. विभाग यांनी सूचना देत 20 सप्टेंबर पर्यंत संबंधित रस्ता दुरुस्त न केल्यास 21 सप्टे. पासून बस बंद करण्यात येईल. अश्या स्पष्ट सूचना प्रत्येक गावातील सरपंच यांना प्राप्त होतास अजय कवरासे यांनीही विद्यार्थी व प्रवाश्याना नाहक त्रास होईल म्हणून बांधकाम विभागाला निवेदन देऊन त्यांना रस्ता तात्काळ बनविण्यासाठी अल्टीमेटम दिलें.
विशेषतः या भागांवरील वेळबाई डोली, कुरई गोवारी (पा.) डाकोरी, निंबाळा, देहूरवाडा, बोरी, मूर्ती येथील विध्यार्थी मोठ्या प्रमाणात वणी शिरपूर-कोरपना येथे शिक्षण घेतात. सदर रस्ता 20 सप्टे पर्यंत दुरुस्त न केल्यास त्या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी व शाळेतील विध्यार्थी सोबत कार्यालयावर “आक्रोश मोर्चा” काढण्यात येईल. याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम उपविभाग जबाबदार राहील. असा स्पष्ट अल्टिमेटम सरपंच अजय कवरासे यांनी निवेदनाद्वारे दिले.