•डी.बी पथकाला यश.
अजय कंडेवार,वणी :– शहरातील शिवाजी पार्क परिसरात 2 युवकांनी युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करून युवकाला गंभीररित्या जखमी करून फरार झाल्याची घटना रविवारी (9.एप्रिल) रात्री घडली होती. अखेर या फरार आरोपींना (दि.13 एप्रिल) ला डी.बी.पथकाने दुसऱ्या राज्यात जाऊन कसून शोध घेतला असता त्या फरार आरोपींचा मुसक्या आवळल्या.” Those “the absconding accused are jailed.. Success to the DB team.
सविस्तर,राकेश शंकर शेवंतावार (वय २७) रा.शास्त्रीनगर असे जखमीचे नाव आहे. समीर मून (वय २७) व अरुण तिराणकर (वय २६) या दोघांनी राकेश शेवंतावर व कुनाल बुर्रेवार व महेश दंतलवार यांचाशी जुन्या वादातून मारहाण केली. परंतु त्यात जास्त जखमी असलेला युवक राजु महादेवराव जगडमवार अंदाजे वय (35) व कुणाल बूरेवार याला ही अत्यंत गंभीर दुखापत झाली. समीर व अरुण यांनी मिळून मिरचीची पूड टाकून रॉडने हल्ला चढवून घटनास्थलावरुन फरार झाले असता, मागील 4 दिवसापासून डी. बी पथकांनी शोध मोहिम सुरू कायम ठेवली व परराज्यातही फेऱ्या मारल्या व अखेर त्यांचा परिश्रमाला यश प्राप्त झाले.. व शेवटी डिबी चमूने गुन्ह्याचा छडा लावलाच व त्यात सदर आरोपी अरूण बळवंत तिरानकर वय २३ वर्ष, प्रणय उर्फ समीर रविन्द्र मुन (वय २१ वर्ष) रा. सम्राट अशोक नगर ,वणी यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही डॉ.पवन बंसोड (पोलीस अधीक्षक यवतमाळ),पियुष जगताप (अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ), संजय पुज्जलवार (उप.वि.पो.अ.वणी) यांचा मार्गदर्शनात P.I प्रदिप शिरस्कर (ठाणेदार पोलीस स्टेशन वणी) A.P.I माधव शिंदे,सुदर्शन वानोळे,सुहास मंदावार, हरीन्द्रकुमार भारती ,पुरूषोत्तम डडमल,सागर सिडाम यांनी केली. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.