• पती “राजन” आणि “ती ” कूठे ?
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील मोहदा येथील बंद गिट्टी खाणीत सापडलेल्या अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलेच परंतु अवघ्या काही तासांतच त्या मृतक महिलेचा खून झाल्याचेही शिरपूर पोलीसांनी निष्पन्न केलें.
मोहदा परिसरात असंख्य गिट्टी खदानी असून या ठिकाणी शेकडो कामगार परप्रांतीय आहे.तालुक्यातील मोहदा येथील बंद गिट्टी खाणीत सापडलेल्या अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला असता .शिरपूर पोलीस स्टेशनला ही बाब मिळताच ठाणेदार गजानन कारेवाड यांनी त्याचा चमुसह घटनास्थळ गाठले. यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरची माहिती डीवायएसपी गणेश किंद्रे यांना दिली असता डीवायएसपी गणेश किंद्रे घटनास्थळ पोहोचले व तपासचक्र वेगाने फिरवून सदर महिलेची ओळख पटविली व कसून चौकशी सुरू आहे अशी माहिती मिळाली परंतू सदर महिलेची हत्या झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आल्याने खळबळ माजली आहे.
येथील स्थित गिट्टी खाणीत काम करून उदरनिर्वाह करीता परराज्यातून येत असतात.अनेक वर्षापासून हा पंडीत परिवार राहत असायचा. पंडीत यांचा घरात नेहमी भांडण व्हायचे अशीही माहिती मिळाली.यातच 3 ते 4 दिवसाआधी पती राजन पंडीत व मृतक पत्नी सरिता पंडीत यांचात वाद झाला.तेव्हापासून राजन पंडीत व त्याची “ती दुसरी “फरार असल्याचेही सांगितल्या जात आहे. अखेर 4 दिवसांनी एक महिलेचा तरंगत्या पाण्यातुन मृतदेह बाहेर काढताच त्या महिलेचे हत्याच झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलें कारण मृतक महीलेचे हातपाय त्याच साडीने बांधून तिचा मृतदेह गिट्टी खदाणीत साचलेल्या पाण्यात अज्ञातताने फेकून दिला व तो फरार झाला असावा असल्याची प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.. पुढील तपास DYSP गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर ठाणेदार गजानन कारेवाड व त्यांची चमू करीत आहे.