•बहिणीचा गावी केले अंत्यसंस्कार.
अजय कंडेवार,वणी :– तालुक्यातील कायर – मुकुटबन रस्त्यावर असलेले 18 नंबरचा पुलानजिक दोन दुचाकी 29 ऑगस्ट रोजी रात्री 7.30 वाजता समोरासमोर भिडल्या, त्यात युवक संदीप पानघाटे (वय 30)रा. अडेगाव हा डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता. त्या अपघातातील गंभीर जखमी युवकाचा अखेर काल 1 सप्टे ला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 4 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाली .
आज दिनांक 2 सप्टेंला निवळी या गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याचा पाठीमागे बहीण होती . महत्वाची बाब म्हणजे आई वडील कोणीही त्याला नव्हते त्यामूळे त्याचे अंत्यसंस्कार त्याचा बहीनीचा निवळी या गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात करण्यात आले.