•सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनचा स्तुत्यमय उपक्रम
अजय कंडेवार, वणी:- सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनचा अध्यक्षा किरण देरकर यांचा वतीने दिनांक 17 जाने ला जि. प. हिंदी प्राथमिक शाळा , लालपुलिया येथे शाळेतीलच चिमुकल्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
वणी येथील महिला धडाडीचे एकमेव सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन .या फाऊंडेशनचा संस्थापिका किरण देरकर या अनेक स्तुत्यमय उपक्रम राबवित असतात. याचाच एक भाग म्हणून त्यांनी संजय देरकर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून लालपुलिया येथील कामगारवर्गातील गरजू मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. या फाउंडेशनने अनेक अशे उपक्रम संपूर्ण वणी उपविभागात राबविले आहे. नवनवीन उपक्रम करण्यात, गरजूंचा मदतीला व अन्यायाला वाचा फोडण्यात ही संघटना अग्रेसरच असते. या गणवेश वाटपात त्या चिमुकल्यांचे चेहरे जणु काही “फुलासारखे “फूललेले दिसुन आले.
या कार्यक्रमाला किरण संजय देरकर,सुरेखा ढेंगळे,वृषाली खानझोडे,वैशाली देठे, अर्चना पिदूरकर, मीनाक्षी मोहिते,शारदा चितकुंटलवार व मुख्याध्यापक नामदेव बोबडे,मोहूर्ले, शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तालावर शिक्षक ( धोपटाळा ) यांनी केले.