•’आदिवासी दिनी’ एक निषेध महिला सुरक्षेसाठी.
•मोर्चात महिला मोठ्या संख्येत सामिल.
अजय कंडेवार,वणी:- आज सगळीकडे जागतिक आदिवासी दिवस (World Trible Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. त्यातच आदिवासी दिनानिमित्त मणिपुर येथील महिलांवरील अत्याचार व हत्येच्या विरोधात जाहीर निषेध म्हणून (दि.9 ऑगस्ट) रोजी सकाळी 11 वाजता ‘भव्य मुक मोर्चात’ एक निषेध लोकशाहीसाठी, एक निषेध आत्मसन्मानासाठी, एक निषेध महिला सुरेक्षेसाठी, एक निषेध देशासाठी, एक निषेध मणिपुरसाठी अश्या प्रकारे निषेध कार्यक्रम कायर येथील आदिवासी समाजातील नंदकिशोर अंबोरे (अध्यक्ष) यांचा मार्गदर्शनात समस्त आदिवासी बांधवांमार्फत काढण्यात आले.Tribal community registered protest at “that..” incident at Kayar .’Tribal Day’ a protest for women’s safety.Women participated in large numbers in the march.
मणिपूर राज्यातील महिलांची नग्न अवस्थेत काढलेली धिंड बलात्कार करून केलेली हत्येचे घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी.मध्य प्रदेशातील भाजपा आमदाराचा कार्यकर्ता प्रवेश शुक्ला ने आदिवासी युवकाच्या अंगावर लघवी केली.त्या अमानवीय कृत्य करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या इसमावर कठोर कारवाई करण्यात यावी. समान नागरी कायदा आदिवासींचा पारंपारिक रूढी परंपरा व संविधानिक हक्क अधिकाऱ्यांना मारक असल्यामुळे आदिवासींना हा कायदा लागू करण्यात येऊ नये. या मागणीसह मनोहर उर्फ संभाजी भिडे याच्यावर महामानवाबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करून त्याच्यावर लगाम लावावा आणि हा निषेध नेमका एक निषेध लोकशाहीसाठी, एक निषेध आत्मसन्मानासाठी, एक निषेध महिला सुरेक्षेसाठी, एक निषेध देशासाठी, एक निषेध मणिपुरसाठी अशा मागणीचे निवेदन करीत कायर येथील आदिवासी समाज बांधवांनी मुक मोर्चा काढून निषेध नोंदविला.
यावेळी नंदकिशोर अंबोरे(अध्यक्ष ),राम देशमुख (उपाध्यक्ष) साधु मडावी(उपाध्यक्ष),अमोल पेन्दोर(सचिव),महेश देशमुख(सदस्य),रोशन मंडपाचे(सदस्य),नानाजी मडावी,वाघुजी पेन्दोर,शिला देशमुख,माया येडकाडे,कल्पना उदे,सुधाकर आञाम ,बाळु पेन्दोर,शञुघन चांदेकर ,शेशिकला टेकाम,शांता मडावी,विजय सोयाम,सुरेखा सोयाम,सुषमा सोयाम,आनंदराव उईके,कवीता आञाम,चंदा सोयाम,रामा चांदेकर,बोनुबाई टेकाम,पार्वता सोयाम,सुधाकर आञाम ,विकास पेन्दोर,नितेश चांदेकर,रोशन बेसरकर,चायकाडे आदी उपस्थित होते.