•वाचा “या ” दोन शिपायांनी केली रात्रभर कसरत.
अजय कंडेवार, वणी:- शहरातील छञपती शिवाजी पार्क परिसरात लोखंडी रॉडने मारहाण करून खुनाचा प्रयत्न करून फरार झाल्याची घटना रविवारी (9.एप्रिल 2023) रात्री घडली होती . यात खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे अशा गंभीर गुन्ह्यामध्ये 4 महिने फरारीत असलेला आरोपी तुषार अशोक उपरे (रा. वणी) याला Dysp गणेश किंद्रे व P.I अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाने इकबाल शेख व वसीम शेख यांनी कसून शोध घेतला असता अखेर(दि.18 ऑगस्ट ) च्या मध्यरात्री सराटी या गावातून त्याचा मुसक्या आवळल्या.The ‘absconding’ accused in that “attempted murder” is in custody..Read “This” two soldiers exercise all night.
सविस्तर,राकेश शंकर शेवंतावार (वय २७) रा.शास्त्रीनगर असे जखमीचे नाव आहे. समीर उर्फ प्रणय मून (वय २७) व अरुण तिराणकर (वय २६) या दोघांनी राकेश शेवंतावर व कुनाल बुर्रेवार व महेश दंतलवार यांचाशी जुन्या वादातून मारहाण केली. परंतु त्यात जास्त जखमी असलेला युवक राजु महादेवराव जगडमवार अंदाजे वय (35) व कुणाल बूरेवार याला ही अत्यंत गंभीर दुखापत झाली. प्रणय, अरुण व तुषार यांनी मिळून मिरचीची पूड टाकून रॉडनेला हल्ला चढवून घटनास्थलावरुन फरार झाले होते त्यातील 2आरोपिंचा अवघ्या 4 दिवसातच वणी पोलिसांनी शोध लावला होता. परंतु त्यातील एक आरोपी तुषार अशोक उपरे हा 4 महिन्यांपासून फरार होता. तुषार हा हैदराबाद येथे लपून असल्याची चूनुक होतीच परंतु काल दि.18 ऑगस्टचा रात्री खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, तुषार हा मारेगाव तालुक्यातील सराटी या गावी त्याचा भावाकडे आल्याची माहिती मिळताच क्षणाचा विलंब न करता मध्यरात्री इकबाल शेख व वसीम शेख या दोघांनी सापळा रचून रात्रभर मोहिम सुरू कायम ठेवली व फेऱ्या मारल्या व अखेर त्यांचा परिश्रमाला यश प्राप्त झाले.
सदरची कार्यवाही डॉ.पवन बंन्सोड (पोलीस अधीक्षक यवतमाळ),पियुष जगताप (अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ), गणेश किंद्रे (उप.वि.पो.अ.वणी) यांचा मार्गदर्शनात व P.I अजित जाधव (ठाणेदार पोलीस स्टेशन वणी) यांच्या आदेशाने इकबाल शेख, वसीम शेख यांनी केली. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.