•अवघ्या वयाचा १६ व्या वर्षी बनविली दुर्गा मातेची मूर्ती
देव येवले, झरी :- आपल्या जीवनात छंदाला विशेष महत्व असून विरंगुळा म्हणून जोपासल्या जाणाऱ्या छंदातून अनेकदा अप्रतिम कलाकृती जन्म घेते. अडेगाव येथील १६ वर्षीय साहिल खोबरे या मुलाने अशीच कला जोपासत अत्यंत देखणी दुर्गा मातेची मूर्ती तयार केली. त्याच्या या मूर्ती कलेचे अनेकांकडून कौतुक व्यक्त होत आहे.
झरी तालुक्यातील अडेगाव येथे राहणाऱ्या साहिल खोबरे यांचे आजोबा आणि वडील हे मूर्तिकार, त्यामुळे लहानपणापासूनच मातीशी दोस्ती असल्याने परंपरागत कलेप्रती त्याची आवड अधिकाधिक होत गेली. सध्या घरी मूर्ती बनविण्याचे काम सुरु असतांना, याने या वर्षी मी ही मूर्ती बनविणार असा हट्ट केला. आणि शाळेतून मिळालेल्या वेळात त्याने आपली आवड जोपासत ३ फुटाची एक सुंदर दुर्गा मातेची मूर्ती तयार केली.
साहिलने बनविलेल्या या मूर्ती कलेचे आलेल्या प्रत्येक व्यक्तीने तोंडभरून कौतुक केले. बनवलेल्या मूर्तीचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये साठवत पुढल्या वर्षी अशीच मूर्ती आम्हाला हवी म्हणून बघणाऱ्यानी शाबासकीची थाप दिली.