•पालक धडकले C.E.O च्या दालनात.
अजय कंडेवार,वणी:- वणी तालुक्यातील कायर येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेतील 8 वा वर्ग बंद पाडण्याचा डाव आखला जात असल्याची कुजबुज सुरु असताच पालकांनी काल दि.30 ऑगस्ट रोजी पालकांनी 8 वर्ग बंद करू नये मागणीचे निवेदनाद्वारे यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याना साकडे घालण्यात आले आहे.Parents stormed into the hall of the C.E.O.
कायर येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहे.2015-16 पासून शाळेत 8 वा वर्ग सुरू करण्यात आला. त्या आधी 7 वा वर्ग होते. शासन नियमानुसार 8 वा वर्ग सुरू करण्यात आला. सध्या आठवीत ३२ विद्यार्थी शिकत आहे.आता शिक्षण विभागाने कायर येथील 8 वा वर्ग बंद करण्याच्या हालचाली सुरू आहे.शाळेला त्यासंदर्भात पत्रही देण्यात आले आहे. मात्र पालकांनी आठवा वर्ग बंद करू नये असा टाहो करीत यवतमाळ येथे C.E.O च्या दालनात जाऊन थेट तो आदेशच मागें घेण्याकरिता धडकले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर अंबोरे, रामदास टेकाम, रवींद्र कोरांगे, रमेश ठावरी,विकास पेंदोर, राकेश मामीडवार, विलास कोटरंगे, युवराज खुटेमाटे, संजय बोरुले,नीलेश मंथनवार,विलास कोटरंगे, युवराज खुटेमाटे, संजय बोरुले उपस्थित होते.