Tuesday, February 17, 2026
HomeBreaking News"तो "...अनोळखी मृतदेह "रणजित सिंग " चा ......

“तो “…अनोळखी मृतदेह “रणजित सिंग ” चा ……

•वाचा.....हा कोण आणि कुठून. •"विदर्भ न्यूज" बातमीने नातेवाईकांना कळले.

अजय कंडेवार,Wani:- तप्त उन्हात वणवण भटकंती करणाऱ्या एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक विश्वसनीय माहीती मिळाली . 25 ते 30 वयोगटातील त्या अनोळखीचा मृतदेह शनिवारी शुशगंगा प्रवेशद्वाराजवळील एका शेतातील झाडाखाली (ता.19 ) रोजी सायंकाळी 7 चा सुमारास आढळून आला होता.सदर इसमाची ओळख पटली नसल्याने सदर व्यक्तीचे शव ग्रामीण रुग्णालय वणी येथे ठेवण्यात आले होते व सदर व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी वणी पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी केले होते.

भूक व उन्हाच्या तडाख्याने त्या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेच्या माहितीवरून वणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उचलून ग्रामीण रुग्णालयाच्या शवगृहात पाठविला. अनोळखी इसमाच्या अंगावर राखळ रंगाचे टी शर्ट ;निळा जिन्स पॅन्ट घातलेला होता. हातात कळा घातलेला होता.मृतकाची उंची ५ फूट ६ इंच असून,गोर सावळा होता. यावरून त्या अनोळखी इसमाची ओळख पटली असून रणजित बहादूर सिंग (अंदाजे वय 25 ) रा.घूग्गुस ,तालुका घुग्गुस,जिल्हा चंद्रपूर असे त्या इसमाचे नाव असल्याचे सिद्ध झाले आहे. सदर मृतक व्यक्ती हा वणीतीलच एका मित्राकडे कामावर जात असल्याचे सांगण्यात आले. मागील 1 दिवसापासून रात्रभर घरी वापस न आल्याने शोधा शोध घेतला असता, थांगपत्ताच लागला नाही शेवटीं एका नातेवाईकाला (19.एप्रिल) रोजी …”वणीत एका तरुणाचा मृतदेह सापडला…..” या मथळ्याखाली विदर्भ न्युज पोर्टलने प्रकाशित केलेल्या बातमीचा माध्यमातुन नातेवाईकांना माहिती मिळाली व थेट नातेवाईकांनी विदर्भ न्युज संपादकाशी संपर्क केला. त्यातून त्या नातेवाईकांना वणी येथे बोलावून घेतलें व पुढील प्रक्रियेला सुरूवात झाली.सदर मय्यत इसमाचा मृत्यु कशाने झाला असावा, याचे कारण मात्र कळु शकले नसल्याने मृत्युचे नेमके कारण मात्र अजुनही गुलदस्त्यातच आहे. खरी बाब शवविच्छेदनानंतर कळेल.वणी पोलीसचे पुढील तपास सत्र सुरु आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments