• वैद्य सावकाराची माहिती नसल्यामुळे अवैध सावकारी फोफावली…
माणिक कांबळे /मारेगाव :- गरजुंना परवाना धारक सावकाराची माहिती नसल्यामुळे अवैध सावकारीचा व्यवसाय फोफावला आहे.Illegal moneylenders flourished due to lack of knowledge of medical moneylenders…
मारेगाव तालुक्यात परवाना धारक सावकाराची माहिती ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध नाही. त्यामुळे गरजू नागरिक आपली आर्थिक गरज अवैध सावकाराच्या दारातुन गुपचूप भागवीत आहेत. सरकारी बँकतुन कर्ज उचल करताना लागणारी कागदपत्राची जुळवा जुळव, त्यासाठी लागणारा वेळ गरजू कडे नसल्याने तो मिळेल त्याच्या कडून कर्जाची उचल करून घेत आहेत.गरजवंताना अक्कल नसते या म्हणी प्रमाणे तो अवैध सावकाराच्या जाळ्यात दिवसा गणिक अडकला जात आहे. गरजूच्या संधीचा फायदा अवैध सावकार दीड, दुपटीच्या रक्कमा करून घेत असताना मात्र याबाबत तक्रारी शून्य आहेत.
गेल्या अनेक वर्षा पासून गरजु ग्राहक आणि सावकार याचे नाते घट्ट असण्याचा इतिहास आहे. सावकारा कडून उचल केलेली कर्जाची रक्कम परतफेड करणारा प्रामाणिक ग्राहक आजही जिवन्त आहे. मात्र ना इलाजास्तव उचल कर्जाची परतफेड करू न शकणारा ग्राहक शेती, घर किंवा अन्य वस्तू सावकाराला विकत आलेला आहे.पारंपरिक पद्धतीने हा आर्थिक व्यवहार सुरु असताना मात्र वैध आणि अवैध अश्या प्रकारचे दोन सावकार सदयाच्या परिस्थिती मध्ये पहायला मिळत आहे.अवैध सावकार हा ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आर्थिक व्यवहार करीत आहे. हा सावकार दरमहा दर शेकडा सवाई देडी आकारूण कर्ज वसुलीचा तकादा लावत असून शेतीची थेट विक्री तो ग्राहकां कडून मारून घेत आहे. कायदेशीर विक्री करून घेतल्यामुळे हा गरजू ग्राहक मुकाट्याने कर्जाची परतफेड करीत असून या अवैध सावकारीत तो लुटला जात आहे. वैद्य सावकाराची माहिती स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात लावल्यास अवैध सावकारीला काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. मात्र परवाना धारक सावकारांची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नसल्याने गरजूची लूट होत आहे.या अवैध सावकारीच्या कर्ज वसुलीच्या तगादया पायी कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असून तक्रार नसल्याने कारवाई शून्य आहे. अवैध सावकार हे मोठ्या भांडवलदाराचे हस्तक असून ते मोठ्या भांडवलदारा कडून 1ते 2 टक्का व्याजाने उचल करून गरजूना मनमानेल त्या पद्धतीने कर्ज पुरवठा करीत असल्याची चर्चा गाव पातळीवर सुरु आहे.या व्यवहाराची नोंद कुठेही नसल्याने ‘”तेरी बी चूप मेरी बी चूप” अशी पद्धत रूढ होत चालली आहे.
अवैध सावकारीचा फोफावलेल्या व्यवसायांची तक्रार नसल्याने कारवाई शून्य असून आळा घालण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत कार्यालयात स्थानिक परवाना धारक सावकाराच्या नावाची यादी लावून प्रसिद्ध करावी अशी मागणी आहे.तसेच सावकारी व्याज दर व कर्जासाठी लागणारी कागदपत्रे यांची सुद्धा माहिती जाहीर करावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.