•इयत्ता पहिलीत वाचन, लेखन व गणन या मूलभूत क्षमता सहजगत्या प्राप्त करतात या उपक्रमाचा उद्देश..
अजय कंडेवार,वणी : शाळास्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा जि.प.उच्च प्राथमिक शाळा, तेजापुर येथे दिं.28 एप्रिल 2023 शुक्रवार रोजी अतिशय उत्साहपूर्वक संपन्न झाली.Pre-School Preparation (School Level) at Tejapur…! The objective of this activity is to easily acquire the basic skills of reading, writing and arithmetic in class I.
या शाळेत शाळापूर्व तयारी उपक्रमात नवीन दाखलपात्र विद्यार्थ्यांचे व पालकांचे सेल्फी घेत शाळेचे पहिले पाऊल ” मी शाळेत येणार”असल्याचे प्रतिकहीदर्शविण्यात आले.
शाळापूर्व तयारी अभियान जिल्हास्तररीय, केंद्रस्तरिय व शाळास्तरीय सुरू आहे. पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी हे पाऊल यंदाही महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.इयत्ता पहिलीला दखलपात्र बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करणे व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीच्या वर्गात बालकांचे सहज संक्रमण घडून येणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ज्या बालकांची शाळापूर्व तयारी चांगली झालेली असते. ती बालके औपचारिक वाचन, लेखन, गणन या मूलभूत क्षमता सहजगत्या प्राप्त करतात.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर कोल्हेकार, उद्घाटक चंद्रभागा सहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश खुसपुरे (केंद्रप्रमुख),आशिष मालेकर (उपसरपंच), आशु पानघाटे(ग्रा.पं.सदस्य), किशोर चहांदे(उच्च श्रेणी मुख्याध्यापक),अंगणवाडी सेविका तसेच पालकवर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सचिन पिंपळकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिक्षिका अनुराधा केळकर व समस्त विद्यार्थांनी परिश्रम घेतले.