•श्रमाचा पैसा गेला कुठे, असा सवाल.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील तेंदू घटक क्र 02 सुकनेगाव,तेंदू घटक क्र 03 कुर्ली व तेंदू घटक 04 वणी येथील तेंदूपत्ता मजुरांना एक वर्षापासून तेंदूपत्ता बोनसची रक्कम मिळाली नाही. सदर रक्कम लवकर द्यावी, या मागणीसाठी वरील तिन्ही घटकातील मजूर व लढा या संघटनेचा माध्यमातून वनपरिक्षेत्र ,वन विभाग (प्रादे.) वणी यांना निवेदन सादर केले.Tendupatta bonus amount” Missing ” Where did the labor money go, the question.?
तेंदूपत्ता मजुरांची बोनसची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करायची होती. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. यासाठी अनेकवेळा पाठपुरावाही करण्यात आला. मात्र रक्कम जमा झाली नाही. मजुरांनी तेंदू हंगामात हालअपेष्टा सहन करून तेंदू संकलन केले. परंतु त्यांच्या श्रमाचा पैसा गेला कुठे, असा सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे. तेंदूपत्ता बोनसची रक्कम अप्राप्त असल्याने आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात आहे, असा आरोपही मजुरांनी केला आहे.एकूण तेंदू बोनस रक्कम एकूण 13 लाख रुपये अधिकाऱ्याच्या सही मूळे मजुराच्या खात्यात जमा झाले नाही. याला निष्काळजीपणा म्हणायला हरकत नाहीच. म्हणून 26 आगस्ट पर्यंत खात्यात रक्कम जमा न झाल्यास तेंदू कामगारांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला.त्यामुळे लवकर बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी मजुरांच्या वतीने केल्या जात आहे.
यावेळी कामगार महिला सविता उईके, रंजना मडावी,गंगु मडचापे, माया उईके, वर्षा मडावी, मीरा मडावी, सविता मडावी,सरिता मडावी,प्रवीण खानझोडे ,अजय धोबे व धनराज येसेकर हे उपस्थित होते.